महामार्गाच्या समांतर रस्त्याला खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:51 AM2019-07-31T00:51:36+5:302019-07-31T00:51:54+5:30
मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्याला सर्वत्र खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेज, कोणार्कनगर, प्रेमदान हॉस्पिटल जवळ, बहिणाबाई चौधरी कॉलेज, हनुमाननगर यांसह मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरातील सर्व्हिस रोडवर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. याशिवाय कोणार्कनगर ते अमृतधाम, मीनाताई ठाकरे ते के. के. वाघ कॉलेज येथे सर्व्हिस रोडवर पथदीप बसविण्याचादेखील प्रशासनाला विसर पडला असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडतात. या खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील मोठे नुकसान होते. खड्डे बुजविण्यासाठी वारंवार मागणी करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहे.
आडगावचे रस्ते खड्ड्यात
मुंबई-आग्रा महामार्गावरून आडगाव गावात जाणारा रस्ता हा जुना महामार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून आडगाव, सय्यद पिंपरी, विंचूर गवळी येथील नागरिकांचा राबता असतो, शिवाय शेतमाल वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.