वक्तृत्व स्पर्धेत पीयूष लिंगायत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:46 AM2019-08-23T00:46:43+5:302019-08-23T00:47:01+5:30
तालुकास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा युवा जागर महाराष्ट्र वर बोलू काही कनिष्ठ महाविद्यालयीन गट या स्पर्धा गुरुवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पीयूष लिंगायत, द्वितीय क्रमांक महेश महाले व तृतीय क्रमांक अक्षय देशमाने यांनी यश प्राप्त केले.
चांदवड : तालुकास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा युवा जागर महाराष्ट्र वर बोलू काही कनिष्ठ महाविद्यालयीन गट या स्पर्धा गुरुवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पीयूष लिंगायत, द्वितीय क्रमांक महेश महाले व तृतीय क्रमांक अक्षय देशमाने यांनी यश प्राप्त केले.
गटशिक्षणाधिकारी श्रीधर देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्ताराधिकारी आर. एन. निकम होते तर एचएचजेबी तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे उपस्थित होते तर परीक्षक म्हणून प्रा. शैलजा पाटील, आफ्रे, मालेगाव येथील प्रा. शेख यांनी काम पाहिले. प्रा. सुनील मोरे, उपप्राचार्य एस. यू. समदडिया, सौ आर.आर. आथरे, प्रा. ख्ािंवसरा, प्रा. आर.एस. पाटील व विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी केले. तर स्पर्धकांना मार्गदर्शन व प्रेरणा शिक्षण विस्ताराधिकारी निकम तर स्पर्धेचे नियम उपप्राचार्य समदडिया यांनी समजावून दिले.
बक्षीस वितरण समन्वयक शांतिलाल अलीझाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी चांदवड तालुका क्रीडा विभागाचे संयोजक निंबाळकर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी तालुक्यामधून दहा महाविद्यालयांनी व २९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस.एम. ब्राह्मणकर, एस.आर. शिंदे यांनी काम पाहिले.
तसेच पी. एस. पाटील, हिरामण शिंदे, ए. यु. सोनवणे, कैलास सोनवणे ,राजेंद्र नहार ,कैलास वाघ, टी आर पाटील,कुमारी सोनाली सोनवणे,श्रीमती रोशनी मोरे,महेश गवळे,प्रवीण मोरे यांनी प्रयत्न केले सुत्रसंचलन व आभार आर एस पाटील यांनी केले आभार एस डी शिंदे यांनी मानले.