लासलगावच्या कांद्याला टपाल पाकिटावर स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:16 AM2021-09-18T04:16:07+5:302021-09-18T04:16:07+5:30
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे, तसेच जागतिक स्तरावर हा कांदा पोहोचावा ...
जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे, तसेच जागतिक स्तरावर हा कांदा पोहोचावा यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत ‘लासलगाव प्याज’ हे विशेष टपाल पाकीट काढले असल्याची माहिती मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांनी दिली. लासलगाव पोस्ट कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला, लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, बळीराजा गटचे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, कांदा व्यापारी हेमंत राका यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविक पोस्ट विभागाचे संदीप रेपे यांनी केले. आभार मनमाडचे डाक निरीक्षक पंकज दुसाने यांनी मानले. यावेळी चांदवडचे डाक निरीक्षक राजेंद्र वानखेडे, लासलगावचे पोस्टमास्तर शांताराम हरकल, डी. आर. दिवेकर आदी उपस्थित होते.
फोटो - १७ लासलगाव टपाल
‘लासलगाव प्याज’ या टपाल पाकिटाचे अनावरण करताना जयदत्त होळकर, सुवर्णा जगताप, नंदकुमार डागा, मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला, राहुल पाटील.
170921\17nsk_29_17092021_13.jpg
फोटो - १७ लासलगाव टपाल