दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्टÑवादीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:56 PM2018-10-03T23:56:32+5:302018-10-03T23:57:09+5:30
सिन्नर : तालुका दुष्काळी जाहीर करावा, तालुक्यातील साथरोगांच्या नियंत्रणासाठी धूर फवारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सिन्नर : तालुका दुष्काळी जाहीर करावा, तालुक्यातील साथरोगांच्या नियंत्रणासाठी धूर फवारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र काकड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून बुधवारी (दि.३) फेरी काढून नायब तहसीलदार पाटील यांना कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यात आले. पावसाळा संपत आला असून, तालुक्यात म्हणावा तसा पाऊस अद्याप पडलेला नाही. पाण्याअभावी खरीप हंगाम वाया जाणार असून, डिसेंबर पूर्वीच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू व इतर आजारांची सात पसरली आहे. हे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी तालुकाभर तातडीने औषधांची फवारणी करावी व गावागावांत आरोग्य विभागाकडून तपासणी शिबिरे आयोजित करावीत.
यावेळी राजाराम मुरकुटे, तानाजी सानप, शुभम भारसाक ळ, तालुका युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष जयराम शिंदे, युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लहामगे किरण नळवाडे, संदीप लोखंडे, अजय साळवे, रंगनाथ देशमुख, रमेश देशमुख, पवन जाधव, प्रमोद पाटील, कुणाल कांगणे, संजय देशमुख, प्रशांत खत्री, सचिन गिते, किरण कुटे उपस्थित होते. जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टॅँकर सुरू करण्याची गरज असून, तालुक्यातील दुष्काळाबाबत तातडीने उपाययोजना करणे जरुरीचे आहे. तालुक्यातील दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व दुष्काळाबाबत तातडीने उपाययोजना करावी यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.