योजना तळापर्यंत पोहोचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:55 PM2020-01-05T22:55:09+5:302020-01-05T22:56:05+5:30
नांदूरशिंगोटे : ग्रामीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, आगामी काळात तालुक्याच्या हितासाठी कामे केली जातील. शासनाच्या योजना तळागळातील व शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझा प्रामणिक प्रयत्न राहील. पाणी प्रश्न, आरोग्याच्या मूलभूत सुविधा, मुलींचे शिक्षण आदी कामांना आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती शोभा बर्के यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. पंचायत समिती स्थापनेनतंर नांदूरशिंगोटे गावाला बर्के यांच्या रूपाने प्रथमच सभापती मिळाल्याबद्दल सत्काराचे आयोजन केले होते. सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उपसरपंच विद्या भाबड, आनंदराव शेळके, विनायकराव शेळके, भाऊपाटील शेळके, प्रभाकर सानप, लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप भाबड, दामोधर गर्जे, गंगाराम सानप, एकनाथ शेळके, सुदाम शेळके, अरुण शेळके, प्रशांत सानप, नागेश शेळके, तुकाराम शेळके, संजय शेळके, शोभा गर्जे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करीन व तालुक्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे बर्के म्हणाल्या. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नानासाहेब शेळके, संजय शेळके, राधाकृष्ण सांगळे, दामोदर गर्जे, बाळासाहेब आव्हाड, शंकरराव शेळके, विनायक शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले़