नियोजित उड्डाणपुलासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:00+5:302021-09-17T04:19:00+5:30
नाशिक महापालिकेच्या वतीने सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करून महापालिका हे उड्डाण बांधणार आहे. त्यावरून आधी भाजप-सेनेत वाद सुरू ...
नाशिक महापालिकेच्या वतीने सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करून महापालिका हे उड्डाण बांधणार आहे. त्यावरून आधी भाजप-सेनेत वाद सुरू झाला. भाजपाने आर्थिक कारणावरून पुलास विरोध केला, मात्र नंतर ते सुरू करण्यास मूक संमती दिली. परंतु आता काम सुरू हाेत नाही तोच ठेकेदार कंपनीने आधी सिमेंटची प्रत बदलण्याची मागणी करून ४४ कोटी रुपये वाढीव घेण्याची तयारी केली. त्यानंतर आता १४ कोटी रुपयांचा घाट घातला गेला. त्यामागे महापालिकेने निविदा न मागवता सल्लागार नियुक्त केल्याचे आढळल्यानंतर आता सल्लागार कंपनीवरून वाद सुरू झाले आहे. त्यावर रंजन ठाकरे यांनी कुठलाही अनुभव नसलेल्या सल्लागाराकडून महापालिकेने अंदाजपत्रक तयार करून घेतले आहे. त्याऐवजी एल ॲण्ड टी, टाटा, आयआयटी या सारख्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा मगच काम सुरू करावे, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आहे.
इन्फो...
मुंबई नाका सर्कलचा आकार लहान करा
मुंबई नाका येथे सतत वाहतुकीही होणारी कोंडी लक्षात घेता मायलॉन सर्कलचा आकार लहान करावा, अशी मागणी रंजन ठाकरे आयुक्तांकडे केली आहे. यापूर्वी व्दारका येथे अशाच प्रकारचे सर्कल हेाते, त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळीदेखील त्याचा आकार कमी करण्यात आला आणि नंतर तर सिग्नल बसवण्यात आला त्याच धर्तीवर मुंबई नाक्यावरदेखील बदल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.