त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीप हंगामाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:26+5:302021-05-29T04:12:26+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर अन्य खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना घरीच ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर अन्य खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना घरीच सोयाबीन बियाणे साठवून ठेवण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी केले आहे.
यावेळी वळवी यांनी सांगितले, खासगी कंपन्यांमार्फत सोयाबीन दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ देण्याकरीता तालुक्यातील बारा गावांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, चालू वर्षाच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामपूर्व शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान उपलब्ध होण्याकरिता बीजप्रक्रियाचे महत्त्व, बियाणे उगवण क्षमता चाचणी, रातडभात निर्मूलन, भातावरील कीड व रोग व्यवस्थापन, शेतकऱ्यांची शेतीशाळा आदी विविध विषयांवर तालुक्यातील कृषी सहायक यांनी तयार केलेले व्हिडिओ कार्यक्रम गावातील शेतकऱ्यांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्रसारित करण्यात येत आहेत. 'एक गाव एक वाण'नुसार बांधावर खत/बियाणे वाटप केले जाणार आहे.
'विकेल ते पिकेल' या संकल्पने अंतर्गत भात, आंबा विक्री
याबाबत मोहीम तालुक्यात राबविण्यात येणार असल्याबाबतची माहितीही तालुका कृषी अधिकारी यांनी दिली.