दिंडोरीत मराठा क्रांती मोर्चाची नियोजन बैठक
By admin | Published: July 10, 2017 12:12 AM2017-07-10T00:12:25+5:302017-07-10T00:12:36+5:30
दिंडोरी : ९ आॅगस्टला मुंबई येथे मराठा क्र ांती मोर्चा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : ९ आॅगस्टला मुंबई येथे मराठा क्र ांती मोर्चा होणार असून, या मोर्चाच्या तयारीसाठी दिंडोरी तालुक्यातून रणशिंग फुंकण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतच ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गनिमी काव्याने या मूक मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्याचा इरादा सकल मराठा समाजाने व्यक्त केला.
दिंडोरी येथील कै. पोपटराव जाधव संकुल येथे सकल मराठा क्र ांती मोर्चाची मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सीमा हिरे, छावाचे करण गायकर, गणेश कदम, चंद्रकांत बनकर, तुषार जगताप, योगेश नाटकर, डॉ. अमोल वाजे, योगेश निसाळ आदींनी मार्गदर्शन करत मुंबई मोर्चाबाबत नियोजन केले.
नाशिक येथे झालेल्या मोर्चात दिंडोरी तालुक्याची महत्त्वाची भूमिका राहिली होती. आता मुंबई मोर्चातही दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, अशी ग्वाही देण्यात आली. दिंडोरी तालुक्याच्या प्रत्येक गावात मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार असून, हा मोर्चा मराठा समाजाच्या मागण्यांसाठी असणार आहे. या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्व समाजाने एकत्रित यावे. मोर्चा आदर्शवत व्हावा यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.बैठकीचे नियोजन सोमनाथ जाधव, रवि जाधव, गंगाधर निखाडे, कवी संदीप जगताप, सुजित मुरकुटे, रावसाहेब बोरस्ते, मनोज ढिकले, नितीन देशमुख, प्रशांत मोगल, विलास लोखंडे, संतोष आंबेकर, रमेश बोरस्ते, ऋषिकेश पडोळ, गोविंद मालसाने, संतोष मुरकुटे, माधव पाचोरकर, योगेश बर्डे, नीलेश पेलमहाले, वाल्मीक मोगल आदींनी केले होते. बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .