शिवजन्मोत्सव समितीची नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:59+5:302021-02-07T04:13:59+5:30
शिवजन्मोत्सव हा सर्वांच्या मनामनात व प्रत्येकाच्या घराघरात साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सालाबादप्रमाणे साजरा होणारा शिवजन्मोत्सव आगळ्यावेगळ्या ...
शिवजन्मोत्सव हा सर्वांच्या मनामनात व प्रत्येकाच्या घराघरात साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सालाबादप्रमाणे साजरा होणारा शिवजन्मोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय विठ्ठल उगले यांनी व्यक्त केला. या वेळी हरिभाऊ तांबे, प्रा. राजाराम मुंगसे, राजाराम मुरकुटे, वामन पवार, दत्ता वायचळे, विनायक सांगळे यांनीही सूचना मांडल्या.
या वेळी कार्यकारिणीत मार्गदर्शक म्हणून आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे. सल्लागारपदी प्रा. राजाराम मुंगसे, भाऊसाहेब शिंदे, राजेश गडाख, विनायक सांगळे, दिलीप केदार, अभिजित दिघोळे. उपाध्यक्षपदी : राजाराम मुरकुटे, मुजाईद खतीब, मच्छिंद्र चिने, सोमनाथ तुपे, निखिल लहामगे, आनंदा सालमुठे, राजेंद्र जगझाप, गौरव घरटे, नामदेव कोतवाल, उदय जाधव. कार्याध्यक्ष म्हणून पांडुरंग वारुंगसे, संजय काकड. खजिनदारपदी हरिभाऊ तांबे, राहुल बलक. सचिव म्हणून जयराम शिंदे, सुभाष कुंभार, सचिन देशमुख. संघटकपदी वामन पवार, दत्ता वायचळे, मंगेश जाधव, कृष्णा कासार, संदीप भालेराव, पंकज देशमुख, भाऊसाहेब शेळके, पंकज जाधव, मंगेश आहेर, मनोहर दोडके. महिला संयोजक म्हणून सविता कोठूरकर, लता मुंडे, संध्या भगत, अॅड. भाग्यश्री ओझा, संगीता मुरकुटे, लता हिले, तृप्ती काळे, रंजना खालकर तर प्रसिद्धिप्रमुख म्हणून डॉ. श्यामसुंदर झळके, संकल्प भालेराव, अक्षय गायकवाड, ऋषी भोर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
फोटो - ०६ विठ्ठल उगले
विठ्ठल उगले
===Photopath===
060221\06nsk_32_06022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०६ विठ्ठल उगले विठ्ठल उगले