शिवजन्मोत्सव समितीची सिन्नरला नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:39 PM2021-02-08T19:39:52+5:302021-02-09T00:45:53+5:30
सिन्नर : शिवजन्मोत्सव समितीच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांची निवड करण्यात आली.
चार वर्षांपासून सिन्नरमध्ये सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा होत असतो. यावर्षीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सवाच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय समितीच्या सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली. बैठकीत सर्वानुमते उगले यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शिवजन्मोत्सव हा सर्वांच्या मना-मनात व प्रत्येकाच्या घरा-घरात साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सालाबादप्रमाणे साजरा होणारा शिवजन्मोत्सव आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा मनोदय विठ्ठल उगले यांनी व्यक्त केला. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच चित्ररथ, लेझीम पथक, ढोलपथक, मर्दानी खेळ यांना फाटा देत शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी दुचाकी, चारचाकी वाहनातून नियोजित मार्गाने महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वावीवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅलीचे आयोजन करावे असे आवाहन हरिभाऊ तांबे यांनी केले. प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढून घरातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे. घरासमोर स्वराज्याचा भगवा झेंडा उभा करून शिवरायांना अभिवादन करावे. घरासमोरील प्रत्येक रांगोळीचे निरीक्षण करुन बक्षीसपात्र रांगोळ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करावा, अशी सूचना प्रा. राजाराम मुंगसे यांनी मांडली. राजाराम मुरकुटे, वामन पवार, दत्ता वायचळे, विनायक सांगळे यांनीही सूचना मांडल्या. यावेळी निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसमावेशक कार्यकारिणीची निवड
मार्गदर्शक म्हणून आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे. सल्लागारपदी प्रा. राजाराम मुंगसे, भाऊसाहेब शिंदे, राजेश गडाख, विनायक सांगळे, दिलीप केदार, अभिजित दिघोळे. उपाध्यक्षपदी : राजाराम मुरकुटे, मुजाईद खतीब, मच्छिंद्र चिने, सोमनाथ तुपे, निखिल लहामगे, आनंदा सालमुठे, राजेंद्र जगझाप, गौरव घरटे, नामदेव कोतवाल, उदय जाधव. कार्याध्यक्ष म्हणून पांडुरंग वारुंगसे, संजय काकड, खजिनदारपदी हरिभाऊ तांबे, राहुल बलक. सचिव म्हणून जयराम शिंदे, सुभाष कुंभार, सचिन देशमुख. संघटकपदी वामन पवार, दत्ता वायचळे, मंगेश जाधव, कृष्णा कासार, संदीप भालेराव, पंकज देशमुख, भाऊसाहेब शेळके, पंकज जाधव, मंगेश आहेर, मनोहर दोडके. महिला संयोजक म्हणून सविता कोठूरकर, लता मुंडे, संध्या भगत, अॅड. भाग्यश्री ओझा, संगिता मुरकुटे, लता हिले, तुप्ती काळे, रंजना खालकर तर डॉ. श्यामसुंदर झळके, संकल्प भालेराव, अक्षय गायकवाड, ऋषी भोर यांच्यावर प्रसिध्दी प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली.