नाशकात मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनासाठी नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:48 PM2018-08-03T12:48:05+5:302018-08-03T12:52:30+5:30

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ९ ऑगस्टच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी तसेच या आंदोलनाला दिशा देण्यासाठी शुक्रवारी (दि.3) नाशिकमधील सिद्ध पिंपरी येथे सिद्धीगणेश मंदिराच्या आवारात मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिद्ध पिंपरी पंचक्राशीतील मराठा समाजाचाच्या नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन मराठा आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली

Planning meeting for the statewide movement of Maratha Kranti Morcha in Nashik | नाशकात मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनासाठी नियोजन बैठक

नाशकात मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनासाठी नियोजन बैठक

Next
ठळक मुद्देचक्काजाम आंदोलनासाठी मराठा समाजाची नियोजन बैठक सिद्ध पिंपरी येथील बैठकीत अहिंसक आंदोलन करण्याचे आवाहन

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ९ ऑगस्टच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी तसेच या आंदोलनाला दिशा देण्यासाठी शुक्रवारी (दि.3) नाशिकमधील सिद्ध पिंपरी येथे सिद्धीगणेश मंदिराच्या आवारात मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिद्ध पिंपरी पंचक्राशीतील मराठा समाजाचाच्या नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेऊन मराठा आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. सिद्ध पिंपरी येथील तालुकास्तरीय बैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, उमेश शिंदे, यांनी चक्काजाम आंदोलनाची आचारसंहिता समाजबांधवाना सांगतानाच कोणत्याही परिस्थिती शांततेच्याच मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, माजी जिल्हा परिषद भाऊसाहेब ढिकले, माजी सभापती अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, उत्तम राजोळे, शंकर ढिकले आदींनी तरुणांनांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पाडण्याचे आवाहन करताना बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलनाची दिशा व रुपरेषा सांगताना चक्काजाम आंदोलनास ९ ऑगस्टला  सकाळी १० वाजता राष्ट्रगीताने सुरवात करण्यास सांगण्यात आले. हे आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.आंदोलनात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी समाजबांधवाणी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठा समाजाने आरक्षणासाठी ऐतिहासिक चक्काजाम करण्याचा निर्धार केला असून आंदोलनकांनी पोलिसांना सहकार्य करावे  अशा सूचनाही यावेळी आंदोलकांना करण्यात आल्या. यावेळी  अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, मनोरमा पाटील, मंगला शिंदे, रोहिणी दळवी, वैभव दळवी,सुरेश ढिकले,अंबादास ढिकले, पंडित जाधव,गणेश ढिकले,शशी ढिकले, भास्कर पवार,नामदेव ढिकले,अन्नदा ढिकले,निवृत्ती ढिकले,कैलास ढिकले, रतन ढिकले,दत्तू ढिकले, कैलास ढिकले, आदित्य पाटील, नितीन ढिकले, अक्षय ढिकले, राहुल ढिकले, रिपेश ढिकले,प्रतीक ढिकले, सतीश पवार, विनोद भ्रमने, रामनाथ ढिकले उपस्थित होते. आदी होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहूती देऊन हुतात्मा झालेल्या समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 

Web Title: Planning meeting for the statewide movement of Maratha Kranti Morcha in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.