शिक्षकांच्या कोविड चाचण्या सोयीच्या ठिकाणी घेण्यासाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 06:34 PM2020-11-18T18:34:26+5:302020-11-18T18:34:55+5:30
सिन्नर: माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ डिसेंबर पासून सुरू होत आहे. शाळेत रुजू होण्यापूर्वी शिक्षकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे.
सिन्नर: माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ डिसेंबर पासून सुरू होत आहे. शाळेत रुजू होण्यापूर्वी शिक्षकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. सिन्नर तालुक्यातील विविध माध्यमिक व उचमाध्यमिक शाळांतील शिक्षकांची कोविड चाचणी करण्यासाठी ग्रामीण भागात केंद्र तयार करून त्या स्वॅब केंद्रावर शिक्षकांचे स्वॅब घेण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश आमदार माणिकराव कोकाटे यांनी गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
गटविकास व तालुका वैद्यकीय अधिकारी याबाबतचे नियोजन करत असून उद्या सकाळी शाळानिहाय स्वॅब केंद्र व चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी दिली.