बालकांच्या बचावासाठी  द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन :  छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 PM2021-06-12T17:00:29+5:302021-06-12T17:02:18+5:30

लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाही याची काळजी पालकांनी देखील घ्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Planning of two level Kovid hospitals for the protection of children: Chhagan Bhujbal | बालकांच्या बचावासाठी  द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन :  छगन भुजबळ

बालकांच्या बचावासाठी  द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन :  छगन भुजबळ

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारीलहान मुलांच्या बचावासाठी नियोजनपालकमंत्र्यांनी घेतली जिल्ह्याची आढावा बैठक

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्याचा लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. परंतु येणारी संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असल्याचे वर्तविले जात असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्यात बाल कोविड केअर रुग्णालय व हाय डिपेंडन्स रुग्णालय अशा द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन करण्यात येत आहे. लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाही, याची काळजी पालकांनी देखील घ्यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शनिवारी (दि.12) जिल्हा व शहर कोरोना सद्यस्थिती उपाययोजना व कोरोना पश्चात आजारांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निखिल सैदाणे, डॉ. आवेश पल्लोड, डॉ. उत्कर्ष दुधडीया आदी उपस्थित होते.
 

Web Title: Planning of two level Kovid hospitals for the protection of children: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.