आठवडाभरापासून नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:33+5:302020-12-22T04:15:33+5:30
क्षणचित्रे * * *राजधानी दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असताना महाराष्ट्रातून या आंदोलनात सहभाग नोंदविण्यासाठी ...
क्षणचित्रे
* * *राजधानी दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असताना महाराष्ट्रातून या आंदोलनात सहभाग नोंदविण्यासाठी किसान सभेचे गेल्या आठवडाभरापासून नियोजन सुरू होते.
* * *दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रविवारीच तयारी करून निघालेली अहमदनगर, सोलापूर, सातारा कोल्हापूर येथील शेतकऱ्यांची वाहने सकाळी ११ वाजेच्या सुमारासच नाशकात दाखल झाली.
* गोल्फ क्लब मैदानावर राज्यभरातून येणाऱ्या आंदोलकांचे नाशिकमधील की सभेचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
* * *मैदानावर पोहोचलेल्या आंदोलकांनी इंकलाब जिंदाबाद किसान एकता जिंदाबाद अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तर आंदोलकांनी लोकगीतांच्या तालावर किसान गीतांचे सादरीकरण केले
* सोमवारी (दि२१) दुपारच्या सुमारास ठाणे,पालघर, महाड, रायगड, रत्नागिरी या भागात आंदोलकांची वाहने मैदानावर दाखल झाली.
* * *शेवटच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा पेठ यासह विविध भागातील आंदोलक मैदानावर पोहोचले.
* राज्यभरातून आंदोलक मैदानावर पोहोचत असताना उशीर झाल्याने निघण्यापूर्वीच्या सभेचे नियोजन लांबले.
* * *शेवटच्या टप्प्यातील आंदोलक मैदानावर पोहोचत असताना अशोक ढवळे , के. के. राजेश, जयंत पाटील, जे. पी. गावित, राजू देसले आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
* * *सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सभेला सुरुवात झाली.यात विविध मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी आंदोलक आपापल्या वाहनांमध्ये बसून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.