बाप्पांसोबत एकतरी वृक्ष लावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 03:03 AM2020-08-22T03:03:04+5:302020-08-22T03:03:25+5:30

अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी आणि देव वृक्षात पहावा, असे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Plant one tree with Bappa! | बाप्पांसोबत एकतरी वृक्ष लावा !

बाप्पांसोबत एकतरी वृक्ष लावा !

googlenewsNext

अझहर शेख
नाशिक : कोरोना महामारीत आपल्या सर्वांचा लाडका उत्सव अर्थात गणेशोत्सव आजपासून सुरू होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने नागरिकांनी बाप्पांच्या पर्यावरणपूरक लहान मूर्तीसोबत एका देशी प्रजातीच्या रोपट्याचेही पूजन करावे. अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी आणि देव वृक्षात पहावा, असे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात प्रत्येक कुटुंबाने गणेशाच्या प्रतिष्ठापनेसोबतच कुंडीत देशी वृक्षाचे रोपटे लावावे. विसर्जनांतर हे रोपटे योग्य ठिकाणी लावून त्याची देखभालकरुन गणेशोत्सवाची आठवण कायमस्वरूपी जपावी, यासाठी सवलतीच्या शासकीय दरात रोपे पुरविण्याची तयारीही वनविभागाने दर्शविली आहे. वनविभागाने कार्यालयात आवळा, जांभूळ, अर्जुनसादडा, करंज, कदंब, बेहडा यासारख्या प्रजातीची रोपे उपलब्ध करुन दिली आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रोपे खरेदी करून त्याची लागवड व संवर्धन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
>नाशिक पश्चिम वनविभागाचे सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होत रोपट्यांचे बाप्पासोबत पूजन करत विसर्जनाच्या मुहूर्तावर लागवड करून संगोपन करणार आहेत. झाडे लावणे आणि ते जगविणे व सण उत्सवांना पर्यावरणपूरक करण्याचा यामागील उद्देश आहे.
- गणेश झोळे, सहायक वनसंरक्षक, नाशिक

Web Title: Plant one tree with Bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.