आनंदी जीवनासाठी वृक्ष लागवड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:00 PM2020-09-08T23:00:47+5:302020-09-09T00:48:48+5:30
त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राहील.
क्लीन इंडिया ग्रीन इंडिया या ब्रह्माकुमारी मुख्यालयातून सुरू झालेल्या प्रकल्पांतर्गत प्रत्येक शहरात प्रत्येक गावात विविध ठिकाणी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे वृक्ष लावण्यात येतात. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर प्रत्येकाला प्रफुल्लित व टवटवीत वाटते.
येथील तलाठी कॉलनीत राजयोग सेवा केंद्रातर्फे उपक्षेत्र संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यात प्रमुख पाहुणे म्हणून येथील नगरसेवक संगीता भांगरे उपस्थित होत्या. प्रास्ताविक बी.के. दिलीप यांनी तर आभार प्रदर्शन निर्मला माता यांनी केले.
या प्रसंगी नाशिक येथून आमंत्रित संस्थेच्या युवा साधकांनी त्र्यंबकेश्वरमधील विविध ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व मास्क लावून विविध जातीच्या ४० वृक्षांची लागवड केली.आरोग्य व विविध उपयोगिता असलेल्या झाडांमुळे आॅक्सिजन तर मिळतोच सोबत पर्यावरण संतुलन राखले जाते. यामुळेच शाळा-महाविद्यालय, लॉन्स, मंगल कार्यालय आदी ठिकाणी झाडे लावून हिरवळ जोपासली जाते. ज्यामुळे लोकांचे मन प्रफुल्लित होते. सोबत व्यक्तीचे आरोग्यसुद्धा सुदृढ रहाते. तन व मन हे स्वस्थ आरोग्य ठेवण्यासाठी वृक्षारोपण हे चांगले माध्यम आहे, असे प्रतिपादन वासंतीदीदी यांनी सांगितले.