नवे रातीरच्या आदर्श शाळेतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:56 PM2019-07-14T16:56:17+5:302019-07-14T16:56:47+5:30
नामपूर : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्र मांतर्गत महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सटाणा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय नवे रातीरची राष्ट्रीय ...
नामपूर : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्र मांतर्गत महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सटाणा संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय नवे रातीरची राष्ट्रीय हरित सेना (ग्रीन आर्मी) व सामाजिक वनीकरण विभाग रातीर,रामतीरच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रामतीर ते सामाजिक वनीकरण क्षेत्र अशी वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी बंडू बच्छाव,मुख्याध्यापक कैलास वाघ, शेंद्रे , वनसंरक्षक अधिकारी यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी रातीर ,रामतीरचे सामाजिक वनीकरण पदाधिकारी ,सरपंच, उपसरपंच, बाळासाहेब अहिरे ,केवळ अहिरे, कैलास अहिरे, कैलास साळुंके,लक्ष्मण अहिरे, वनरक्षक स्वाती सावंत, समाधान अहिरे, शशिकांत ढेपले, ज्ञानेश्वर ढेपले, एकनाथ अहिरे, उपशिक्षक रमेश ह्याळीज, एस. एम. पगार, युवराज जगताप,कर्मचारी वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.