कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले तालुक्यातील पन्हाळसाठे येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 07:57 PM2019-07-18T19:57:53+5:302019-07-18T19:58:22+5:30
येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बाभूळगाव व पन्हाळसाठे शिवारात वृक्षारोपण करण्यात आले.
येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बाभूळगाव व पन्हाळसाठे शिवारात वृक्षारोपण करण्यात आले.
प्राचार्य डॉ. डी. पी. कूळधर, उपप्राचार्य डॉ. के. एम. मुठाळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, समन्वयक सुनील पवार, राष्टÑीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. युवराज ठोंबरे यांच्यासह प्राध्यापक व विदयार्थी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्व विशद करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे जपण्याची जबाबदारी देत वृक्षाविषयीची गरज समजावून सांगितली.
विद्यार्थी व प्राध्यापकांनी वन विभागाच्या वतीने ‘एकच लक्ष दोन कोटी वृक्ष’ या कार्यक्र मात सहभाग नोंदविला. पन्हाळसाठे शिवारात विविध प्रकारची रोपटे लावण्यात आले. तसेच लागवड केलेल्या रोपट्यांच्या संवर्धनाची जवाबदारी विद्याथ्यांना देण्यात आली.
दरम्यान बाभूळगाव येथेही महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्याची जबाबदारी स्विकारली.
(फोटो १८ येवला ट्री)
वृक्षारोपण करतांना कृषी महाविदयालयाचे प्राध्यापक व विदयार्थी.