कळवण महाविद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:59+5:302021-06-06T04:10:59+5:30
कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. पगार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात विविध जातीच्या ...
कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. पगार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात विविध जातीच्या वड, बेहडा, सुबाभूळ, मोह आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. पगार यांनी यावेळी सांगितले की, पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून जास्तीतजास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मानव साक्षर जरी झाला, तरी त्याला खऱ्या अर्थाने पर्यावरणीय साक्षर होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने पर्यावरणदूत म्हणून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम. पगार, प्रा. आर.बी. आहेर, डॉ. एन.बी. कोठावदे, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही.एम. पगार, प्रा. बी.सी. कच्छवा, डॉ. एम.डी. वाघ, प्रा. श्रीमती पूनम वाघेरे, श्रीमती एस.डी. जाधव, श्री. गोरख बागुल उपस्थित होते.