करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:09 PM2019-07-03T19:09:07+5:302019-07-03T19:09:26+5:30

निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.

 Plantation in Karanjangaon-Manjargaon Road | करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण

करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण

Next
ठळक मुद्देवृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी कृषिदूतांनी प्रयत्न केले.

निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.
या योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार वृक्षलागवड हिवरगाव-म्हाळसाकोरे-गाजरवाडी व करंजगाव-मांजरगाव रस्त्यावर करण्यात येणार आहे. यावेळी निफाडचे वनक्षेत्रपाल संदिप पाटील, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, करंजगावचे सरपंच राजेंद्र राजोळे, माजी सरपंच खंडू बोडके, नंदू राजोळे, नंदू निरभवणे, सचिन राजोळे, वनपाल अजय शिंदे, शरद चितोडे, भाऊसाहेब माळी, वनरक्षक योगिता काळे-खिरकाडे, अश्विनी सोमवंशी, हर्षवर्धन सोळसे, प्रदीप पवार, शरद दराडे आदी उपस्थित होते.
खेडलेझुंगे येथे वृक्षदिंडी सोहळा
निफाड : येवला तालुक्यातील बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत व तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेडले झुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिनानिमित्त खेडलेंझुगे येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.
वृक्ष लागवड काळाची गरज, वृक्ष संवर्धन, एक मूल एक झाड असा संदेश या वृक्ष दिंडीच्या निमित्ताने देण्यात आला. याप्रसंगी जुन्या व नवीन लावलेल्या झाडाचे केक कापून वाढदिवस देखील साजरे करण्यात आले. यावेळी सरपंच सुषमा गीते, प्राचार्य एस. सी. राहटल, पर्यवेक्षक डी. पी. कडवे, वायकर, क्षीरसागर, विलास निरभवणे, पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब केदारे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्र माचे आयोजन कृषी महाविद्यालय बाभूळगाव येवला येथील प्रामुख्याने अनिकेत बोरस्ते, अभिजित भड, गौरव थोरात, ऋ षिकेश दरेकर, अक्षय बागल, विवेक भगरे, सुरज तिडके, गोरख कोल्हे, धनंजय निकम या कृषिदूतांनी केले होते त्यांना प्राचार्य डॉ. डी. पी. कूळधर, डॉ. किशोर मुठाळ, प्रा. जयपाल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
येवला तालुक्यातील बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, जळगांव ग्रामपंचायत व जि. प. प्राथमिक शाळा यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त तालुक्यातील जळगांव येथे कृषी दिंडी काढण्यात आली होती. याप्रसंगी विनता वडघुले, गणेश वडघुले, ज्ञानेश्वर वडघुले, रमेश वडघुले, अमति वडघुले, जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय डेर्ले, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसगी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
ही वृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी शुभम भालेराव, श्याम आगळे, अमर लिंगाराव, चंदू मधूमानी, भूषण भालेराव, प्रवीण देवरे, तुषार बोरसे, राहुल देशमुख या कृषिदूतांनी प्रयत्न केले.

Web Title:  Plantation in Karanjangaon-Manjargaon Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल