चांदवडला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:47+5:302021-06-09T04:16:47+5:30

चांदवड : शहरातील सोमवार पेठ व अन्य सर्वच प्रभागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ...

Plantation in potholes on Chandwad road | चांदवडला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

चांदवडला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

Next

चांदवड : शहरातील सोमवार पेठ व अन्य सर्वच प्रभागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, बिपीन पानपाटील, समाधान आहेर, राजेंद्र पगारे, कलिम शेख, चंदन भाटेवाल, इकबाल शेख, नीलेश निकम, वसंत जाधव, मंगेश गायकवाड, आकाश बनकर, गणपत गुंजाळ, सुनील जाधव व रिपाइंचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यांनी चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम, पोलीस निरीक्षक समीर बारवक यांना निवेदन दिले.

शहरातील बाजारपेठ, सोमवार पेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, पोस्ट गल्ली, साखळीवाडा, उदरू शाळा, कुंभार गल्ली, शिंपी गल्ली, वरचेगाव, हनुमाननगर, पंचशीलनगर, बागवानपुरा, डावखरनगर, फुलेनगर, भैरवनाथ कॉलनी, गणेश कॉलनी, गुजराथी नगर सर्वच कॉलन्यांमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी स्लीप होत आहेत. अनेक दुचाकी चालकांचे छोटे -मोठे अपघात झाले. या मागणीकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा निवेदनात दिला आहे.

---------------------------------------------------------------------------

फोटोची ओळ 08 एम.एम.जी.6- चांदवड शहरातील बाजार वेस व सोमवार पेठेत गांधीगिरी करीत रस्त्यावर वृक्षारोपण करताना राजाभाऊ अहिरे, बिपीन पानपाटील, राजेंद्र पगारे, कलीम शेख, चंदन भाटेवाल, इकबाल शेख, नीलेश निकम आदी.

===Photopath===

080621\08nsk_24_08062021_13.jpg

===Caption===

०८ एमएमजी ६

Web Title: Plantation in potholes on Chandwad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.