सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 05:39 PM2019-07-17T17:39:34+5:302019-07-17T17:41:17+5:30
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात वृक्षारोपन करुन वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात वृक्षारोपन करुन वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
शासनाचे वृक्षलागवड संकल्पनेचा भाग म्हणून सिन्नर मुख्य बाजार आवारात सोमवारी बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एस. पी. गायकवाड व सचिव विजय विखे यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
बाजार समितीने मुख्य बाजार आवारत १०० वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले. तसेच नायगाव, पांढुर्ली, वावी, वडांगळी व दोडी बुद्रुक या बाजार समितीचे उपबाजार आवारांत सुमारे ४०० वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले. यापुढील काळात बाजार समितीच्या आवारात व उपबाजार समितीच्या आवारा भोवती बख्खळ जागेत वृक्षांचे वृक्षारोपन करण्याचा बाजार समितीने निर्धार केला आहे. यावेळी माजी सभापती कचरु डावखर, समितीचे कर्मचारी आर.एन.जाधव, ए. सी. शिंदे, पी. आर. जाधव, डी. जे. राजेभोसले, आर. जे. डगळे, एस. के. चव्हाणके, एस. ए. बाळदे, डी. एन. तांबे, डी. आर. पाटोळे, आर. आर. उगले, एस. व्ही. वाळुंज, व्ही. बी. मोरे, पी. व्ही. गवळी, व्ही. एस. कोकाटे, एस. एल. डावखर, वाय. एन. गोळेसर कर्मचारी उपस्थित होते.