रेल्वे असोसिएशनतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:14+5:302021-07-14T04:18:14+5:30
उपविभागीय कार्यालय सुरू नाशिक रोड : महापालिकेचे उपकार्यालय वडनेर दुमाला येथे सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली ...
उपविभागीय कार्यालय सुरू
नाशिक रोड : महापालिकेचे उपकार्यालय वडनेर दुमाला येथे सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. नूतन उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन विभागीय अधिकारी संजय गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक जगदीश पवार, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे आदींची उपस्थितीत होते. वडनेर दुमालामध्ये विभागीय कार्यालय नसल्याने नागरिकांना नाशिक रोड येथे जावे लागत होते.
शालेय समितीची बैठक
नाशिक रोड : गांधीनगर येथील जनता विद्यालयात शालेय शिक्षण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करणे, आयसीटी लॅब मंजुरी व नवीन वर्ग खोल्या बांधणे याबाबत चर्चा झाली. समितीचे साहेबराव पवार, योगेश कासार, वाल्मिक जाधव, अनिल गांगुर्डे, नामदेव आढाव, प्रशांत कळवणकर, पोपटराव लांडगे आदी समिती सदस्य उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक सुरेंद्र बच्छाव यांनी मानले.
पावसामुळे पिके बहरली
नाशिक : जिल्ह्याच्या काही भागांत खरीप पिकांची लागवड होऊन महिना झाला असून, पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतीत झाले होते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर पिके चांगली बहरली आहेत. येवला तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पावसामुळे चिंतेचे ढग दूर झाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रेनकोटची खरेदी
नाशिक : पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने बाजारात रेनकोट घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. मध्यंतरी पाऊस लांबल्याने, अनेकांनी रेनकोट खरेदीचा निर्णय स्थगित केला होता. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून पाऊस सक्रिय झाल्याने अनेकांची पावले दुकानांकडे वळू लागल्याचे दिसून येत आहे.