कोटमगाव विठ्ठलाचे येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:05 PM2021-06-08T22:05:45+5:302021-06-09T00:58:37+5:30
जळगाव नेऊर : कोरोना विषाणुच्या सावटामुळे या वर्षी शिवशंभु भक्तांना रायगड येथील शिवराज्यभिषेक सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. परंतु निराश न होता येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठलाचे येथे शिव शंभु एकत्र येत वृक्षरोपणाचे आयोजन करत कोरोणा प्रतिबंधात्मक नियमाचे तंतोतत पालन करुन शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवराज्याभिषेक दिनी गोरख कोटमे यांनी मित्र परिवाराच्या जन्मदिनी वृक्ष रोपण व वृक्षसंगोपण करण्याचा संकल्प केला.या वेळी शिव मुर्ती पुजन कोटमगावचे पोलिस पाटील जयवंत कोटमे व अजय घिगे यांच्या हस्ते तर जेष्ठ मार्गदर्शक नानासाहेब कोटमे यांनी वृक्षपुजन केले.
कार्यक्रम प्रसंगी छत्रपती संभाजी सेवा समिती तालुकाध्यक्ष रविंद्र बिडवे, रामेश्वर तांदळे, नाना कोटमे, कैलास बिलवरे, भाऊसाहेब कोटमे, श्रावण कोटमे, बापु पाटील, सचिन ढमाले, भुषण भिलवरे, योगेश घायवट, जालिंदर कोटमे, प्रविण पाटील तसेच कोटमगाव विठ्ठलाचे येथील ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते.