दोनशे झाडांची लागवड, धुळवाडच्या सौंदर्यात घालणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 02:35 PM2020-10-01T14:35:25+5:302020-10-01T14:36:53+5:30
सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'वृक्ष लागवड आणि संगोपन' असा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नळवाडी येथे मंचद्वारे राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला असून त्याच धर्तीवर हा उपक्रम हाती घेतला आहे.

सह्याद्री युवा मंचच्यावतीने विविध प्रकारची २०० झाडे लावण्यात आली. मंचचे संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड झाली. भाऊसाहेब आव्हाड, मारुती आव्हाड, विष्णु आव्हाड, तानाजी आव्हाड, भिकाजी आव्हाड, अर्जुन आव्हाड, बाजीराव आव्हाड, निवृत्ती आव्हाड, मधुकर आव्हाड, प्रकाश आव्हाड, दादाहरी सांगळे, , खंडु आव्हाड, किरण आव्हाड, सागर आव्हाड , मारूती आव्हाड, सोमनाथ घुगे आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडी बरोबरच त्यास संरक्षक जाळ्याही लगेचच बसवण्यात आल्या.
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून मंचद्वारे वृक्ष लागवड व त्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलली जात आहे. परिसर सुशोभित व्हावा, पर्यावरणाचा समतोल टिकावा या सामाजिक उद्देशाने मंचद्वारे विविध गावांत हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, झाडांची लागवड करून जोपासना करावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांनी केले.
तीन गावांत करणार एक हजार वृक्ष लागवड
धूळवाड व्यतिरिक्त दापूर, चापडगाव, देशवंडी या तीन गावांत लवकरच एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. मंचच्यावतीने त्याचे संगोपनही केले जाणार आहे. स्थानिक कार्यकर्ते ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. मंचद्वारे गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. तालुक्यातील आठ गावांत चार हजारावर वृक्षलागवड यापूर्वी करण्यात आली आहे. यातील 80 टक्के झाडे जगवण्यात आली आहेत.