नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

By Suyog.joshi | Published: October 24, 2023 04:49 PM2023-10-24T16:49:29+5:302023-10-24T16:50:26+5:30

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Planting of the historical Mahabodhi tree in Nashik, a ceremony attended by thousands of worshipers | नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

नाशिक -  ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील हजारो बुद्ध उपासक तसेच देश-विदेशातील भिख्खू उपस्थित होते. विजयादशमी अर्थात मंगळवार, दि. २४ रोजी पांडवलेणीजवळ त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्रीलंकेचे सांस्कृतिक मंत्री विदूर विक्रम नायक, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने १८ कोटींचा तातडीने निधी देत या कामात सिंहाचा वाटा उचलला. हा बोधीवृक्ष श्रीलंकेतून आणला असून ही एक प्रकारे महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्याच झाडाचे नाशिकमध्ये रोपण होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. विदूर विक्रम नायक म्हणाले, या देशात फक्त एकच भाषा आहे, ती आहे हद्याच. प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमानेच वागले पाहिजे. एकमेकातील कटूता दूर व्हायला हवी. ऐतिहासिक बोधी वृक्ष म्हणजे हा मानवतेचा संदेश देणाो असून बुद्धांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्याचे प्रत्येकाने अवलोकन करणे गरजेचे आहे.

मंत्रोच्चारात कार्यक्रम
बौद्ध भिखू महासंघाच्यावतीने बुद्ध उपासना व मंत्रोच्चारात महाबोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित भिखूंनी या झाडाला माती अर्पण केली. त्यानंतर इतर मान्यवरांनी झाडाला पाणी घातले. कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण, ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संदेश
कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे उपासकांना संदेश दिला. भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यत पाेहोचविण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे समता, बंधुता, शांतता पाळणारी, मुल्ये जाेपासणारे राज्य आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी शांतीची उजळणी करण्याचा सल्ला शिंदे यांनी दिला.

Web Title: Planting of the historical Mahabodhi tree in Nashik, a ceremony attended by thousands of worshipers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक