ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे एक हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:53 IST2020-09-10T23:35:42+5:302020-09-11T00:53:02+5:30
येवला : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने ‘माय इंडिया, ग्रीन इंडिया’, ‘एक पेड - एक जिंदगी’ या उपक्रमांंतर्गत लॉकडाऊन काळातही तालुक्यात यावर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली आहे.

ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे एक हजार वृक्षांची लागवड
येवला : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने ‘माय इंडिया, ग्रीन इंडिया’, ‘एक पेड - एक जिंदगी’ या उपक्रमांंतर्गत लॉकडाऊन काळातही तालुक्यात यावर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. येवला शहरासह तालुक्यातील अंगणगाव, रायते, अंदरसूल, देवदरी, राजापूर, चिचोंडी, नागडे, बदापूर, टाकळी, येसगाव, बाभूळगाव, पाटोदा आदी गावांमध्ये या उपक्रमाअंर्तगत वृक्षारोपण करण्यात आले. बहावा, अशोका, आवळा, चिंच, सिताफळ, कौठ, वड, निंब, पिंपळ रामफळ, आंबा, चिकू, बॉटल पाम, सुपारी, नारळ आदी प्रकारचे झाडे व फळझाडे लावण्यात आली. नियोजन ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नीतादीदी, ब्रह्माकुमारी अनुदीदी, ब्रह्माकुमारी दामिनीदीदी यांनी केले. उपक्रमासाठी अंदरसुल एमएसजीएस ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सागर गाडेकर, महेश शेटे, प्रवीण बनकर, प्राचार्य पंकज निकम, प्राचार्य कोकणे, नानासाहेब कुराडे यांनी सहकार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी आवश्यक असणारी रोपे उपलब्ध करून दिली.