दोन तासात अडीच हजार रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:43+5:302021-07-01T04:11:43+5:30
सिन्नर : वनप्रस्थ फाउंडेशनच्या पुढाकाराने व माळेगाव एमआयडीसीतील लिग्रा इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सहकार्याने सिन्नर-घोटी मार्गावरील आई भवानी मंदिर ...
सिन्नर : वनप्रस्थ फाउंडेशनच्या पुढाकाराने व माळेगाव एमआयडीसीतील लिग्रा इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सहकार्याने सिन्नर-घोटी मार्गावरील आई भवानी मंदिर परिसरात महावृक्षारोपण झाले. वनप्रस्थच्या वृक्षमित्रांनी केवळ दोन तासात सुमारे अडीच हजार रोपांची लागवड करण्यात आली.
प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून व प्रातिनिधिक स्वरुपात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून लिग्रा इंडिया कंपनीचे जनरल मॅनेजर प्रशांत कवटे, एचआर विभागप्रमुख सुहास काळे, गोदामाई प्रतिष्ठान कोपरगावचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, आई भवानी देवस्थानचे विश्वस्त बाजीराव बोडके, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, सामाजिक वनीकरण अधिकारी सांगळे, वनविभागाच्या श्रीमती राठोड, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.
‘वनप्रस्थ’ने आतापर्यंत आई भवानी डोंगरावर सुमारे ३५०० पेक्षा अधिक रोपांची लागवड केली असून यावर्षी स्वदेशी व दुर्मिळ प्रजातीच्या २१०० रोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु स्वयंसेवकांनी सुमारे २५०० खड्डे खोदून तयार झाले. थेऊरच्या देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले पाटील यांच्या सहकार्याने सुमारे ४५ प्रजातींची ११०० स्वदेशी व दुर्मिळ रोपे प्राप्त झाली. लिग्रा इंडिया कंपनीने १ हजार झाडांचे पालकत्व स्वीकारले. तसेच रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर, रोटरी क्लब ऑफ सिन्नर, भास्कर आव्हाड, सोनांबे ग्रामपंचायत आणि वृक्ष दात्यांच्या सहकार्याने सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक रोपांचे संकलन झाले. त्यातील २५०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात उर्वरित रोपांची लागवड केली जाणार आहे. आतापर्यंत लावलेल्या व संवर्धन केलेल्या झाडांची संख्या ६ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच आजवर लावलेल्या प्रजातींची संख्या सुमारे ७० च्या वर गेलेली आहे.
----------------------
वृक्षदान अभियानाला उदंड प्रतिसाद
‘मी निसर्गाचा कर्जदार’ या मथळ्याखाली ‘वनप्रस्थ’ने वृक्षदान अभियान राबविले. याला सिन्नर शहरासह विविध ठिकाणच्या वृक्षप्रेमींनी साद दिल्याने वृक्षारोपणाचे काम सुलभ झाले. वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक सुनील विशे, उमेश देशमुख, सोपान बोडके हे वर्षभर वृक्ष संगोपन करीत आहे. गेल्या चार महिन्यांपासून वृक्षांच्या रोपणासाठी खड्डे घेण्यासाठी दत्ता बोराडे, राजाभाऊ क्षत्रिय, डॉ. महावीर खिंवसरा, राजेंद्र जाधव श्रमदान करीत असल्याचे वृक्षमित्र अभिजित देशमुख यांनी दिली.
-------------
सिन्नर-घोटी मार्गावरील आई भवानी मंदिर परिसरात महावृक्षारोपण झाले. त्याप्रसंगी माहिती घेताना प्रांताधिकारी पूजा गायकवाड. समवेत वनप्रस्थ फाऊंडेशनचे कार्यकर्ते. (३० सिन्नर ३)
===Photopath===
300621\30nsk_9_30062021_13.jpg
===Caption===
३० सिन्नर ३