प्लाझ्मा हिरोचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:15+5:302021-05-01T04:13:15+5:30
----------------------------------------- न्यायडोंगरीत घरोघरी आरोग्य तपासणी नांदगाव : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत न्यायडोंगरी गावात प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, ...
-----------------------------------------
न्यायडोंगरीत घरोघरी आरोग्य तपासणी
नांदगाव : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत न्यायडोंगरी गावात प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, आशा वर्कर व अन्य शासकीय कर्मचारी घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करत आहेत.
न्यायडोंगरी ग्रामपालिका व प्राथमिक आरोग्य केंद्र न्यायडोंगरी यांच्य़ा समन्वयातून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानामध्ये ७ गट करण्यात आले असून त्यांना पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, सँनिटायझर, मास्क व स्टेशनरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियानाचा शुभारंभ सरपंच, उपसरपंच, ग्रामपालिका सदस्य, ग्रामसेवक व वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपालिका आवारात पार पडला. गावातील सर्व नागरिकांनी या तपासणी मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------------------
साडेपाच फुटाची घोणस पकडली
नांदगाव : जळगाव बु. येथे घोणस जातीचा साडेपाच फूट लांबीचा अत्यंत विषारी साप विजय बडोदे यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला. पोलीस पाटील रविंद्र सरोदे यांच्या शेतात मक्याच्या चाऱ्यात तो लपून बसला होता.
घोणस विषारी सापांमध्ये चिडखोर साप आहे. चिडल्यानंतर प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज काढतो. या सापावर अजगरासारखे चट्टे पट्टे असतात त्यामुळे लोक याला अजगर समजतात. सर्पमित्र विजय बडोदे यांनी या सापाला पकडले.
फोटो - ३० नांदगाव घोणस
साडेपाच फुटांची घोणस
===Photopath===
300421\30nsk_15_30042021_13.jpg
===Caption===
फोटो - ३० नांदगाव घोणस साडे पाच फुटांची घोणस