प्लॅस्टिकबंदी केवळ कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:20 AM2020-12-05T04:20:43+5:302020-12-05T04:20:43+5:30

--------- मोसमपूल चौकाचे विद्रुपीकरण मालेगाव : शहरातील मुख्य चौक व प्रवेशद्वार असलेल्या मोसम पूल चौकाला डिजिटल फलकांनी विळखा घातला ...

Plastic ban only on paper | प्लॅस्टिकबंदी केवळ कागदावर

प्लॅस्टिकबंदी केवळ कागदावर

Next

---------

मोसमपूल चौकाचे विद्रुपीकरण

मालेगाव : शहरातील मुख्य चौक व प्रवेशद्वार असलेल्या मोसम पूल चौकाला डिजिटल फलकांनी विळखा घातला आहे. शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. ऊठसूट फलकबाजी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विनापरवानगी फलक लावले जात आहे. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

----------

सटाणा नाका भागात अतिक्रमण

मालेगाव : शहरातील सटाणा नाका भागात अतिक्रमणाने विळखा घातला आहे. येथील बसस्थानक परिसरात हातगाड्या लावल्या जात आहेत. तसेच सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर दुकाने लावली जात आहेत. चौकाचे सुशोभिकरणाचे कामही रखले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. चौकातील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

----------

अयोध्यानगर भागात गटार रस्ता काम करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील अयोध्यानगर भागात गटार व रस्त्यांची समस्या कायम आहे. या भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने रस्त्यावरच पाणी सोडले जात आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

--------

रासायनिक खतांची मागणी वाढली

मालेगाव : सध्या रब्बी हंगामातील पिकांची लागवड सुरू आहे. तर काही ठिकाणी खुरपणी व निंदणी सुरू झाली आहे. कांदा लागवडीलाही वेग आला आहे. परिणामी रासायनिक खतांना मागणी वाढली आहे. कृषी सेवा केंद्रांवर रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.

-------

टेहरे गावाजवळ उड्डाणपूल उभारण्याची मागणी

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर सोयगावकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ व टेहरे गावाजवळ उड्डाणपूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या दोन्ही ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उड्डाणपूल उभारला तर वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

-------

नववसाहत भागात रस्ते दुरुस्तीची मागणी

मालेगाव : सोयगाव नववसाहत भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात कॉलन्या कॉलन्यांना जोडणारे रस्ते उखडले आहेत. नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. वारंवार रस्ते दुरुस्तीची मागणी करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

-------

जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली

मालेगाव : कोरोनाकाळात येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणारा जनावरांचा बाजार बंद होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून शुक्रवारचा आठवड्याचा जनावरांचा बाजार पुन्हा भरू लागला आहे. शेतकरीही जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणत आहेत. परिणामी बाजारातील उलाढाल वाढली आहे. बाजार समितीलाही बाजार शुल्क मिळू लागले आहे.

---------

मालेगाव - दाभाडी रस्त्याची दुरवस्था

मालेगाव : मालेगाव ते दाभाडी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. अवजड वाहने व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण देवरे, विजय पवार, दिनेश ठाकरे, हेमलता मानकर, पांडुरंग भदाणे, हर्षल पवार आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

--------

सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी

मालेगाव : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हेगार परराज्यात बसून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित नागरिकांना गंडवत असतात. शहरात याचे प्रमाण वाढले आहे. मालेगावी स्वतंत्र सायबर सेल सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Plastic ban only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.