Plastic Ban : आदिवासी कष्टकऱ्याांचे छप्पर पडले उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:34 AM2018-06-25T06:34:50+5:302018-06-25T06:35:18+5:30
महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून राज्यात केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने समाजातील अनेक घटकांवर कमी जास्त प्रमाणात बरा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत
पेठ : महाराष्ट्र शासनाने 23 जून पासून राज्यात केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने समाजातील अनेक घटकांवर कमी जास्त प्रमाणात बरा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत असून आदिवासी भागातील कष्टकरी शेतमजूरांच्या घरे शाकारणीवर याचा दुष्परिणाम झाल्याचे पिसून येते.
पेठ तालुक्यात वाडी वस्तीवर बहुंताश घरे कौलारू, गवताचे व उतरत्या छपराचे असतात. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कौलातून पावसाचे तुषार येत असल्याने दरवर्षी पावसापूर्वी घरे शाकारणी करावी लागते. यामध्ये कौलांच्या व गवताच्या खालून प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन टाकून कौले किंवा गवत लावले जाते. मात्र शासनाने आता प्लॅस्टिक बंदी केल्याने आठवडे बाजारातून प्लॉास्टिक कागदांची विक्र ी कमी झाली आहे.
दंडाच्या भितीने ग्राहकही खरेदी करण्यात नाखुष असल्याने आदिवासी कष्टकरी शेतमजूरांनी शासनाच्या या आवाहनाला पर्याय शोधून सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे.आदिवासी भागात अजूनही सागाची झाडे बर्यापैकी असल्याने जंगलातून मोठमोठी सागाची पाने गोळा करून त्यांचे घराच्या छप्परावर आच्छादन दिले जात आहे. तर काहींनी बंदी लागू होण्यापुर्वीच कापड खरेदी केल्याने गुपचूप कागद टाकून कौलांनी झाकून देण्याची लगबग सुरू केली आहे.
विक्र ेते बाजारात दाखल
23 जून पासून प्लास्टिक बंदी होणार असल्याचे सुतोवाच मिळाल्याने शुक्र वारी ( दि.22) रोजी करंजाळीच्या आठवडे बाजारात व्यापार्यांनी मोठया प्रमाणावर प्लॅस्टिक कागद, घोंगडया विक्र ीसाठी आणल्या होत्या.एकीकडे खरेदी केलेला माल मिळेल त्या भावात विक्र ी करण्याकडे व्यापार्यांचा कल असतांना दुसरीकडे शेतमंजूर व कष्टकर्यानी मात्र प्लॅस्टिक कागद खरेदी करतांना जरा हात आखडताच घेतल्याचे दिसून येत होते. बहुतांश व्यापार्यांनी दरवर्षी प्रमाणे मोठया प्रमाणावर प्लॅस्टिक कागदाची खरेदी करून ठेवल्याने आता हा साठवून ठेवलेला माल कसा विक्र ी करावा या विवंचनेत लहान मोठे व्यापारी सापडले आहेत.