संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात प्लास्टीक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:26 PM2020-01-09T14:26:54+5:302020-01-09T14:27:04+5:30

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेत प्लॅस्टीक वापरण्यास बंदी करण्यात आली असून प्लॅस्टीकचा वापर करणारे व्यावसायिक व वारकरी, भाविक आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 Plastic ban on santa nivritnath Maharaj yatra | संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात प्लास्टीक बंदी

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात प्लास्टीक बंदी

Next

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेत प्लॅस्टीक वापरण्यास बंदी करण्यात आली असून प्लॅस्टीकचा वापर करणारे व्यावसायिक व वारकरी, भाविक आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेत बैठक पार पडली. त्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला.
यात्रा कायदा आणि सुव्यवस्था राखून आनंदाने व उत्साहाने साजरी करत स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केले आहे.
येत्या १९, २०, व २१ रोजी होणा-या संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा निर्मल वारी म्हणुन संपन्न व्हावी असा आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नुकत्याच झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत दिला होता. ही बाब मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानुसारयात्रेत निर्मल वारी अभियान हे राष्ट्रीय अभियान म्हणुन राबवावे असे सांगितले. यासाठी सेवाभावी संस्था डॉ.भरत केळकर यांचा सहभाग घेण्याचे ठरले. आज झालेल्या नगरपरिषदेच्या यात्रा नियोजन बैठकीत निर्मलवारी अभियानाची चर्चा झाली. यावेळी नगरपरिषदेने यात्रेची काय काय तयारी केली आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम यांनी दिली. तसेच यात्रा कालावधीत करावयाच्या कामांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
बैठकीत दिंड्याचे स्वागत करणे, नोंदी करणे, स्वागत फलक लावणे आदी सुचना करण्यात आल्या. कुशावर्त तिर्थावर जीवरक्षक, दोन्ही पहाडांवर पोलीस बंदोबस्त, यात्रा कालावधीत बस स्थानक, जव्हार फाटा, गजानन महाराज संस्थान समोर असावे. आरोग्य सुविधेची माहिती उपजिल्हा रु ग्णालयातर्फे देण्यात आली. याबरोबरच वनविभाग पुरवठा विभागातर्फे गॅससिलेंडर, साखर, गहु ,डाळी, तांदुळ चांगल्या दर्जाचे मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेसाठी उपनगराध्यक्ष कैलास चोथे, गटनेते समीर पाटणकर, स्वप्निल शेलार, आरोग्य सभापती माधवी भुजंग, बांधकाम सभापती सायली शिखरे, पाणी पुरवठा सभापती शिल्पा रामायणे, महिला व बालकल्याण सभापती भारती बदादे , त्रिवेणी तुंगार, सोनवणे सागर आदी उपस्थित होते.

Web Title:  Plastic ban on santa nivritnath Maharaj yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक