मनपा अधिकाऱ्यांना प्लॅस्टिक आवरण भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:40 AM2018-06-28T01:40:30+5:302018-06-28T01:41:02+5:30
नाशिकरोड : राज्यात प्लॅस्टिकबंदी करताना कुठल्याही उपाययोजना न करता घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहे. प्लॅस्टिकला आधी पर्याय उपलब्ध करून द्या त्यानंतरच दंड आकारणी करावी अशी मागणी करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा विभागीय अधिकाºयांना प्लॅस्टिक आवरण असलेले कंपन्यांचे खाद्य पदार्थांचे पाकीट भेट दिले.

राज्यात शासनाने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेताना त्याकरिता पर्याय उपलब्ध करून दिला नाही, यामुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यातच प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली व्यापाºयांना आर्थिक दंड केला जात आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेना, मनविसे यांच्या वतीने बुधवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना विविध कंपन्यांचे खाद्य पदार्थांचे प्लॅस्टिक आवरणाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या भेट देण्यात आल्या. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनास नाशिकरोड व्यापारी संघटनेचे नेमीचंद कोचर यांनी व्यापारी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला. आंदोलनामध्ये मनविसे शहराध्यक्ष श्याम गोहाड, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, शहर उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर, साहेबराव खर्जुल, प्रकाश कोरडे, अतुल धोंगडे, विनायक पगारे, अमर जमधडे, संदीप आहेर आदी सहभागी झाले होते.