प्लॅस्टिकमुक्त नाशिकसाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:02 AM2017-08-31T01:02:54+5:302017-08-31T01:03:00+5:30

शहर कॉँग्रेस सेवादल व कॉलेज कॅम्पस फें्रड्स नाशिक यांच्या वतीने श्रीगणेश उत्सवानिमित्त सुमारे दहा हजार कापडी निर्माल्य पिशव्या बनवण्यात आल्या असून, श्रीगणेश उत्सवानिमित्त पर्यावरणाचा व स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प केला आहे.

Plastic-free Nashik initiative | प्लॅस्टिकमुक्त नाशिकसाठी पुढाकार

प्लॅस्टिकमुक्त नाशिकसाठी पुढाकार

Next

शहर कॉँग्रेस सेवादल व कॉलेज कॅम्पस फें्रड्स नाशिक यांच्या वतीने श्रीगणेश उत्सवानिमित्त सुमारे दहा हजार कापडी निर्माल्य पिशव्या बनवण्यात आल्या असून, श्रीगणेश उत्सवानिमित्त पर्यावरणाचा व स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पानुसार ‘संकल्प करूया प्लॅस्टिकमुक्त नाशिकचा, कापडी-कागदी पिशव्या वापरूया’, हा संदेश देण्यात येणार आहे. तसेच या संदेशाची छपाई कापडी पिशव्यांवर करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात पूजेचे निर्माल्य या कागदी व कापडी पिशवीत संकलन करून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याकरिता हा संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. सुमारे दहा हजार पिशव्या बनविण्यात आल्या असून, या कापडी पिशव्या नाशिक शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना वाटण्यात येणार आहे. या पिशव्यांचे वाटप व उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२५) शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर तसेच नाशिक शहर कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, सेवा दलाचे संघटक आर. आर. पाटील, स्वतंत्र सैनिक पंडितराव येलमामे, माजी नगरसेविका डॉ. सुचिताताई बच्छाव, बबलू खैरे, उद्धव पवार, किशोर बाफणा, अ‍ॅड. अरूण दोंदे, अण्णा मोरे, आकाश घोलप, मुन्ना ठाकूर, सचिन दीक्षित, कैलास कडलक, प्रवीण बेन्स, राजेश बेन्स, राजेंद्र बागुल, रु बिना शेख, दीपक परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॉलेज कॅम्पस फें्रड्स संस्थेची स्थापना २००३ साली झाली. तेव्हापासून संस्था विविध पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबवित असते. २००९ साली संस्थेने स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी चित्ररथ काढून समाजप्रबोधन केले. त्याचे तत्कालीन राज्याचे आरोग्य उपसंचालकांनी कौतुक करून तसे संस्थेला उपक्रमाच्या कौतुकाचे महाराष्टÑ शासनाचे पत्रही दिले. तसेच २०११ साली संस्थेचे पर्यावरण रक्षणासाठी दहा हजार वृक्षांचे वाटप केले. त्यासाठी ‘वृक्ष आपल्या दारी’ या उपक्रमाचा चित्ररथ काढून तो शहरभर फिरविला होता.

Web Title: Plastic-free Nashik initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.