ट्रकभर प्लॅस्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:13 AM2019-02-15T01:13:42+5:302019-02-15T01:14:17+5:30
राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
नाशिकरोड : राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
मनपा प्रशासनाला देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स दुकानात राज्यात बंदी घातलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, वाट्या, डिशेस आदी वस्तू साठविल्या असल्याची माहिती मिळाली. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य संचालक सचिन हिरे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, अनिल गांगुर्डे, जनार्दन घंटे, कर्मचारी रोशन दिवे, मनोज फाजगे, संजय काळे, सुभाष जाधव, भरत गायकवाड यांनी सुरक्षारक्षकासह गुरुवारी दुपारी उद्धव ट्रेडर्स दुकानात छापा मारून तपासणी केली असता त्या ठिकाणी बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या विविध वस्तू आढळून आल्या.
पाच हजार रुपये दंड
मनपाच्या आयशर ट्रकभर थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस, वाट्या, ग्लास आदी साहित्य जप्त करण्यात येऊन दुकान मालक जाजू यांना पाच हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.