सुरगाणा नगरपंचायततर्फे प्लास्टिक जप्ती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:01 PM2018-12-14T13:01:52+5:302018-12-14T13:02:05+5:30
सुरगाणा : येथील नगरपंचायतने अखेर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून अंमलबजावणी सुरु झाली आहे.
सुरगाणा : येथील नगरपंचायतने अखेर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यासाठी सुरगाणा नगरपंचायत देखील सज्ज आहे. आपल्या परीने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत.सुरगाणा नगरपंचायतने यासाठी एक पथक तयार केले आहे. शहरात हे पथक प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी फिरणार आहे. दरम्यान एक पथकं आठवडा बाजारापासून कारवाईला सुरु वात करणार आहेत. ज्यांच्याकडे प्लास्टिक असेल ते जप्त करण्यात येणार आहे. पहिल्या वेळी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाहीय, मात्र दुसऱ्या वेळी त्याच व्यक्तीकडे, व्यापाºयाकडे प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ५०० ते दहा हजार रु पयांपर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी दिली आहे. दरम्यान जनता, व्यापारी तसेच विक्र ेत्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण शहरात रिक्षाच्या माध्यमातून ध्वनीक्षेपाद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे जनता, विक्र ेते, व्यापारी आम्हाला या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावनीसाठी सहकार्य करतील असा विश्वास मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी व्यक्त केला. यावेळी कर्मचारी सुनिल पवार, किशोर चव्हाण,जगदिश पिठे, लिपिक, मनोज पवार, विजय गोयल, अजिज शेख, सोमनाथ बागुल, गोविंद जाधव, भिका पिठे आदी उपस्थित होते.