नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८५ जणांवर प्लॅस्टिक शस्त्रक्रि या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:42 PM2017-12-07T16:42:44+5:302017-12-07T16:43:06+5:30
नाशिक - जिल्हा रूग्णालय येथे सुरू असलेल्या मोफत प्लॅस्टिक शिबिरास नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसात ८५ रूग्णांवर तज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रि या केल्या असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.
भारतीय जैन संघटनेची नाशिकरोड शाखा, अखिल भारतीय परमेष्टी फाऊंडेशन व जिल्हा रूग्णालय यांच्या वतीने स्व. बालकराम गुप्ता यांच्या स्मृती निमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दुभंगलेले ओठ, चेहºयावरील व्रण, डाग व नाकातील बाह्य विकृती यावर उपचार केले जात आहेत. यासाठी आतापर्यंत २१० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरात पहिल्या दोन दिवसात एकुण ८५ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रि या करण्यात आल्या आहेत. ११२ जणांवर शस्त्रक्रि या होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या शस्त्रक्रि या अमेरिका येथून आलेले प्लॅस्टिक सर्जरी तज्ञ डॉ. राज लाला, डॉ. ललीता लाला, डॉ. अमित बसनवार, डॉ. कल्याणी बसनवार हे करत आहेत.