सायखेडा विद्यालयात प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 10:39 PM2019-10-06T22:39:06+5:302019-10-06T22:40:13+5:30
सायखेडा : मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना दिली. विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा खैरनार यांनी प्रास्ताविक केले.

प्लास्टिकचे विघटन होत नसून तो जाळला तरी त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडू शकते म्हणून प्लास्टिक न वापरणे हि काळाची गरज आहे. यावेळी निफाडचे गटविकास अधिकारी कराड, गटशिक्षणाधिकारी तुंगार, विस्तार अधिकारी हिरे, प्राचार्य मनीषा खैरनार, उपप्राचार्य पी. एस. कापडणीस, पर्यवेक्षक एस. एस. शिरसाट, राजेंद्र कदम, अशोक गावले, रामकृष्ण भामरे, ज्ञानेश्वर कर्पे, माणिक गिते, सोमनाथ शिंदे, संजय चौधरी, श्रीमती शिंदे, श्रीमती हिंगे आदी उपस्थित होते.
कार्यक्र माचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत आवारे यांनी केले. तर आभार अशोक टर्ले यांनी मानले.