पांडवलेण्याजवळ कर्मचारीच टाकतात प्लॅस्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:07 PM2017-11-22T23:07:49+5:302017-11-23T00:40:35+5:30

शहराचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असून, पर्यटकांना ही बाब अडचणीची ठरते आहे.

Plastics waste near the pedestal | पांडवलेण्याजवळ कर्मचारीच टाकतात प्लॅस्टिक कचरा

पांडवलेण्याजवळ कर्मचारीच टाकतात प्लॅस्टिक कचरा

Next

नाशिक : शहराचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असून, पर्यटकांना ही बाब अडचणीची ठरते आहे.  पांडवलेणी हे पर्यटनस्थळ तर आहेच, परंतु दररोज लेणी चढ-उतर करणारे व्यायामप्रेमीदेखील आहेत. आरोग्याविषयी असे सजग नागरिक असतानादेखील परिसरात अनेकदा कचरा आढळतो. नाशिकमधील विविध व्यावसायिक आणि सेवाभावी संस्था परिसरात कचरा टाकू नये विशेषत: प्लॅस्टिक बॅग्ज या स्वत: उचलून टाकत असताना येथील कर्मचारी मात्र त्यादृष्टीने सजग नाहीत. गेल्या रविवारी असाच प्रकार आढळल्यानंतर अभियंता सुजित जाजू आणि अन्य काही नागरिकांनी हटकले. त्यावेळी अशा प्रकारचा कचरा नियमितपणे टाकून तो जाळून टाकत असल्याचे संबंधित कर्मचाºयांनी सांगितले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चांगले पर्यटनस्थळ आणि पर्यावरणासाठी पोषक वातावरण असताना अशा प्रकारच्या अनास्थेमुळे येथे अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने वेळीच दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 
अनावस्थेमुळे अस्वच्छता 
पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत आहे.
विविध व्यावसायिक आणि सेवाभावी संस्था परिसरात कचरा टाकू नये विशेषत: प्लॅस्टिक बॅग्ज या स्वत: उचलून टाकत असताना येथील कर्मचारी मात्र त्यादृष्टीने सजग नाहीत.  ४चांगले पर्यटनस्थळ आणि पर्यावरणासाठी पोषक वातावरण असताना अशा प्रकारच्या अनास्थेमुळे येथे अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Plastics waste near the pedestal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.