मिठसागरे येथे प्लॅस्टिकमुक्ती जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 08:15 PM2018-08-14T20:15:41+5:302018-08-14T20:16:19+5:30
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील कै. पुंडलिक भिमाजी कथले माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून प्लॅस्टिकमुक्त व स्वच्छ गाव या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील माध्यमिक विद्यालय व ग्रामपचंयतीच्या वतीने गावात फेरी काढून घोषणा देण्यात आल्या. ‘एकच ध्यास, संपुर्ण गाव प्लॅस्टिक मुक्त गाव’, एकच ध्यास ठेवूया, प्लॅस्टिक पिशवी हटवूया, सबका एकही नारा, स्वच्छ हो देश हमारा आदी घोषणांनी परिसर व गाव दुमदुमुन टाकला. या फेरीत गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. सार्वजनिक ठिकाणे, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मारुती मंदिर आदि ठिकाणी जावून प्लॅस्टिकबंदीचा प्रचार व प्रसार केला. त्यानंतर विद्यार्थी गावातील व परिसरातील सर्व प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकॉल ताटे, बाटल्या, वाट्या, चमचे, तुटलेले प्लॅस्टिकच्या वस्तू , घरगुती वापरातील प्लॅस्टिकच्या वस्तू आदी गोळा करण्यात आल्या व त्या पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांच्या स्वाधीन केल्या. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना डॉ. पवार व मुख्याध्यापक सी. बी. रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकबंदीची शपथ देण्यात आली. यावेळी सरपंच अॅड. शरद चतुर, उपसरपंच श्याम कासार, कारभारी चतुर, माधव कासार, श्याम गोसावी, आर. आर. काळे, एस. पी. शिंदे, सुभाष ठोक, उध्दव म्हस्के, विकास सोनवणे, मंगेश देसाई, एस. एस. घोरपडे, एम. बी. सोनवणे आदी उपस्थित होते.