एकांकिका स्पर्धा नवोदितांना घडविणारे व्यासपीठ

By admin | Published: January 18, 2017 12:08 AM2017-01-18T00:08:24+5:302017-01-18T00:08:36+5:30

गीता कपूर : ‘बाबाज करंडक’ उद््घाटनप्रसंगी प्रतिपादन

The platform that organizes the one-act competition newcomers | एकांकिका स्पर्धा नवोदितांना घडविणारे व्यासपीठ

एकांकिका स्पर्धा नवोदितांना घडविणारे व्यासपीठ

Next

नाशिक : रंगभूमीची मोठी परंपरा असतानाही नाट्य व क ला क्षेत्रात नवोदित कलाकारांना संधी मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, अशा नवोदित कलाकारांना त्यांच्यातील कलागुणांना सादर करण्यासाठी एकांकिका दर्जेदार व्यासपीठ मिळत असल्याचे प्रतिपादन चित्रपट निर्माता गीता कपूर यांनी केले.  परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मंगळवार (दि.१७) पासून राज्यस्तरीय ‘बाबाज करंडक’ स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धाच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अ‍ॅड. विजया माहेश्वरी, अ‍ॅड. शुभांगी कडवे, आनंद बच्छाव, प्रकाश साळवे आदि उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर राज्यभरातील विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांना दिवसभरात एकामागून एक अशा ११ एकांकिका सादर केल्या. नाशिकच्या प्रयोगशाळेच्या आदील नूर शेख यांच्या वेटिंग फॉर सेन्सशनल या एकांकीने स्पर्धांची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईच्या शब्द क्रिएशन्सचे ‘बम्बई से आया मेरा दोस्त’, नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारकडे केअर नाशिकचे रेनमेकर, स्पंधनचे क्रियेटिव्हीटी, कला निर्मितचे हाइड अ‍ॅण्ड सिक, पुणे येथील थिअटर वर्कशॉपचे गिनीपिग्स, कल्याणच्या अभिनयचे दर्देपोरा, धुळ्याच्या ए. एम. डी.चे कळ्या बंबाळ अंधारी, नाशिच्या सप्तशृंगी शिक्षण मंडळाचे फुगडी आदि नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धांमध्ये ३६ प्रवेशिका असून, या स्पर्धा बुधवार व गुरुवारी पार पडणार असून, गुरुवारी स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळ्याने समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)
















 

Web Title: The platform that organizes the one-act competition newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.