पेठवासियांचा प्लॅस्टिकमुक्तीसाठी संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:57 PM2017-12-22T22:57:09+5:302017-12-23T00:34:37+5:30
वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी फिरून या घातक वस्तूवर आळा घालण्याची हाक देत असताना दिसून येत आहे.
पेठ : वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी फिरून या घातक वस्तूवर आळा घालण्याची हाक देत असताना दिसून येत आहे. पेठ येथील एकपात्री कलाकार संकेत नेवकर हे नगरपंचायत व तालुका क्षेत्रात प्लॅस्टिकमुक्ती अभियान राबवत आहेत. आठवडे बाजारात भाजीविक्रे ते व ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ते वासुदेवाचा वेश परिधान करून लोकांना प्लॅस्टिक वापरापासून विविध ओव्यांच्या माध्यमातून परावृत्त करतात. येथे कॅरिबॅग मिळत नाही व मी बाजारात जाताना कापडी पिशवी नेतो.. तुम्ही? अशा प्रकारचे संदेश देत त्यांनी जनजागृती अभियान सुरू केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत संगमेश्वर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संकेत नेवकर यांनी तालुक्यातील वाडीवस्तीवर जाऊन एकपात्री प्रयोगातून गावकºयांचे प्रबोधन केले. यामधून त्यांनी प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम, घातक आजार व पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम लोकांच्या मनात रुजवण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकही त्यांच्या ह्या अभियानाला चांगला प्रतिसाद देत असून, गावागावात त्यांच्या प्रबोधनाने नागरिकांनी प्लॅस्टिकवर बंदी आणण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
नगरपंचायतीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
पेठ नगरपंचायत क्षेत्रात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी अभियान राबविण्यात येत असून, यासाठी नागरिक, व्यापारी व ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी शिवकलाकार संकेत नेवकर यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आपल्या एकपात्री प्रयोगातून पेठच्या सार्वजनिक ठिकाणी, भाजीबाजार व शासकीय कार्यालयात संकेत यांनी प्रबोधनात्मक प्रयोग सादर केले. भाजी बाजारात कापडी पिशवी आणणाºया ग्राहकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.