सटाण्यात करवसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 05:44 PM2020-02-14T17:44:41+5:302020-02-14T17:45:08+5:30

सटाणा:येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे.

Play municipal drums for taxation in stocks | सटाण्यात करवसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव

सटाण्यात करवसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव

Next

सटाणा:येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे. या गांधीगिरीमुळे थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
आज शुक्र वारपासुन घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांकडुन करवसुलीसाठी विशेष धडक मोहिम पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांनी कर निरिक्षक कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष वसुली पथक निर्माण केले आहे. या पथकात सर्व क्षेत्राचे क्षेत्र प्रमुख व त्यांचे सहाय्यक यांच्यासह महिला कर्मचारी व नळजोडणी खंडीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा - यांचा देखील समावेश करण्यात आला आहे . विशेष वसुली पथकामार्फत थकबाकीदारांच्या दारात ढोलताशा वाजविण्यात येत आहेत .वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडीत करण्यात येत आहेत . मोठया प्रमाणात थकबाकी असणा - यांवर जप्तीचे वॉरट बजविण्यात येत आहेत. सटाणा नगर परिषदेने गेल्या 3 वर्षात सलगपणे 90 त्न पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट पूर्ण केले आहे. या वर्षी 95 त्न पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट ठेवले आहे. कितीही कालावधी उलटला तरी व्याजासह कराचा भरणा टाळता येणार नसल्याने थकबाकीदारांनी वेळेत कर भरणा करु न कटु प्रसंग टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: Play municipal drums for taxation in stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक