‘प्रहार’चे थाळी वाजवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:06+5:302021-05-24T04:13:06+5:30

सिन्‍नर : कडधान्य आयात थांबली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात थाळी ...

Play the 'Prahar' plate | ‘प्रहार’चे थाळी वाजवा आंदोलन

‘प्रहार’चे थाळी वाजवा आंदोलन

Next

सिन्‍नर : कडधान्य आयात थांबली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले.

लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने योग्य भावात शेतमाल विक्री करता येत नाहीत. शेतमालाचे भाव वाढलेले नाहीत; पण खतांचे भाव दुप्पट वाढवले. देशात तूर, उडीद, मूग यांचे मुबलक उत्पादन असताना आयात केली जात आहे. पर्यायाने भाव कोसळणार असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद‌्ध्वस्त होणार आहेत याचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करून निषेध केला.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कोरोना व लॉकडाऊनचे नियम पाळत तालुकाध्यक्ष शरद शिंदे, शहराध्यक्ष दौलत धनगर, उप तालुकाध्यक्ष सुनील महाराज, शेतकरी शिवाजी गुंजाळ, शेतकरी अर्जुन घोरपडे आदी ५ व्यक्‍तींनी आंदोलनात सहभाग घेतला.

फोटो ओळी: २३ सिन्नर प्रहार

सिन्‍नर येथे थाळीनाद आंदोलनात सहभागी झालेले प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी.

===Photopath===

230521\23nsk_20_23052021_13.jpg

===Caption===

सिन्‍नर येथे थाळीनाद आंदोलनात सहभागी झालेले प्रहारचे पदाधिकारी व शेतकरी.

Web Title: Play the 'Prahar' plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.