पालिकेचे अ‍ॅप प्लेस्टोअरवर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:58 AM2019-04-18T00:58:33+5:302019-04-18T00:58:51+5:30

नागरिकांच्या नागरी सेवांसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करणे तसेच आॅनलाइन परवानग्यांसाठी उपयुक्त ठरलेले एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅप पुन्हा गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

Players' app is filed on Playstore | पालिकेचे अ‍ॅप प्लेस्टोअरवर दाखल

पालिकेचे अ‍ॅप प्लेस्टोअरवर दाखल

Next

नाशिक : नागरिकांच्या नागरी सेवांसंदर्भातील तक्रारींचे निराकरण करणे तसेच आॅनलाइन परवानग्यांसाठी उपयुक्त ठरलेले एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅप पुन्हा गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हे अ‍ॅप नाही त्यांना ते डाउनलोड करून घेता येणे शक्य होणार आहे.  महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षीच नूतनीकरण केलेले ई-कनेक्ट अ‍ॅप सादर करण्यात आले होते. त्यात नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याची व्यवस्था होती. त्याचबरोबर तक्रार चोवीस तासांत प्रथम प्राधिकृत अधिकाऱ्याने उघडली नाही तर ती वरिष्ठांकडे म्हणजे खाते प्रमुखांकडे फॉरवर्र्ड होते आणि तक्रार न उघडणाºया अधिकाºयास अ‍ॅटो जनरेटेड नोटीस बजावली जाते. त्याचा त्यांच्या वेतनवाढीवर परिणाम होतोच, शिवाय सेवापुस्तकात नोंद केली जाऊ शकते. या तरतुदींमुळे तक्रारी तत्काळ निवारणाचे प्रमाण वाढले.
त्यानंतर गेल्याच वर्षी महापालिकेने ५५ सेवा आॅनलाइन केल्या असून, घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यापासून विविध प्रकारच्या परवानग्या देण्यापर्यंतच्या सेवा आॅनलाइन केल्याने नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपविषयी लोकांना माहिती मिळेल तसे ते डाउनलोड करून घेत असले तरी पंधरा दिवसांपूर्वी हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवरून गायब झाले होते. यासंदर्भात, ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर गुगल कंपनीने सर्वच अ‍ॅपची सुरक्षा कारणास्तव तपासणी सुरू केली असून महापालिकेने कायदेशीर बाबींची पूर्तता केली असून, लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, आता हे अ‍ॅप बुधवार (दि. १७) पासून गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

Web Title: Players' app is filed on Playstore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.