विविध वयोगटांत खेळाडूंचे प्रतिनिधित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:50 AM2018-07-28T00:50:34+5:302018-07-28T00:50:55+5:30

कोणत्याही क्रीडा संस्थेच्या विकासासाठी त्या संस्थेचे प्रशासकीय कामकाज, साधनसामग्री, आर्थिक स्थिती, खेळाडूंचा विकास, खेळाडूंना संधी आणि पारदर्शक कारभार हे घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळेच राज्य क्रिकेटच्या प्रत्येक वयोगटात नाशिकचे खेळाडू चमकत आहेत, असे खेळाडू पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार धनपाल (विनोद) शहा यांनी सांगितले.

 Players representation in various age groups | विविध वयोगटांत खेळाडूंचे प्रतिनिधित्व

विविध वयोगटांत खेळाडूंचे प्रतिनिधित्व

googlenewsNext

नाशिक : कोणत्याही क्रीडा संस्थेच्या विकासासाठी त्या संस्थेचे प्रशासकीय कामकाज, साधनसामग्री, आर्थिक स्थिती, खेळाडूंचा विकास, खेळाडूंना संधी आणि पारदर्शक कारभार हे घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळेच राज्य क्रिकेटच्या प्रत्येक वयोगटात नाशिकचे खेळाडू चमकत आहेत, असे खेळाडू पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार धनपाल (विनोद) शहा यांनी सांगितले.  नाशिक क्रिकेट असोसिएशनचा कारभार हे एक उत्तम टीमवर्क आहे. अगदी प्राथमिक कामांपासून ते प्रशासकीय कामांपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला असोसिएशनचे बारकावे माहीत आहेत. आरोप हे होतच असतात; परंतु पारदर्शकता आणि विश्वासार्हता आमच्या सर्वांमध्ये असल्याने कोणत्याही आरोपाला फार महत्त्व नाही.  मुर्तझा ट्रंकवाला हा महाराष्टÑाकडून अंडर-१९ खेळत असताना त्याने शतक ठोकले, त्यानंतर तो रणजी मॅचेस खेळला; परंतु त्याची अंडर-२३ साठी निवड झाल्याने तो तिकडे खेळायला गेला. याचा अर्थ तो रणजीतून बाहेर पडला असे होत नाही. सत्यजित बच्छाव, माया सोनवणे, प्रियंका घोडके, रोशन वाघचौरे, मुस्ताक कांचवाला, श्रेयस वालेकर, तन्मय शिरोडे, यासर शेख हे महाराष्टÑाच्या विविध वयोगटांत खेळत आहेत. बीसीसीआयचे पंच, रणजीचे कोच, सिलेक्टर, टुर्नामेंट कमिटी अशा विविध भूमिका असोसिएशनचे पदाधिकारी राज्यात बजावत आहेत.

Web Title:  Players representation in various age groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा