सांगा मायबाप सरकार, त्यावेळी तुम्ही कुठे होतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:40+5:302021-09-12T04:18:40+5:30
जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नाही, तर काही शेतकऱ्यांना ...
जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नाही, तर काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे देशात सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला. इतकेच नव्हे तर परदेशातही सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाल्याने यावर्षी सोयाबीनची टंचाई निर्माण झाल्याने दरात वाढ झाली आहे. मागील दहा वर्षांचा विचार केला तर कधी नव्हे ते सोयाबीनचे सर्वसाधारण दर सात ते साडेसात हजार रुपये आणि अधिकाधिक दर १०,१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले आहेत. मात्र सन २०१२ पासून उत्पादन खर्च वर्षागणिक वाढत गेला तरी सोयाबीन सर्वसाधारणपणे २३०० पासून ३७०० रुपये यावरच स्थिर राहिले आहेत. खुल्या बाजारात तरी किमान तीन हजारांच्या पुढे दर मिळत होता.
चौकट-
मागील दहा वर्षांतील सोयाबीनचे दर (क्विंटल)
वर्ष दर शासनाचा हमीदर
२०११-१२ २३३२ १६९०
२०१२-१३ ३५६४ २२४०
२०१३-१४ ३६७७ २५६०
२०१४-१५ ३६४२ २५६०
२०१५-१६ ३६४६ २६००
२०१६-१७ ३२३१ २७७५
२०१७-१८ २९८६ ३०५०
२०१९-२० ३७०८ ३३९९
२०२०-२१ ४०३७ ३७१०
२०२१-२२ ७६६२ ३९५०