ठाणगाव येथे पहिल्याच पावासाने नागरिकांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:53 PM2020-06-14T17:53:43+5:302020-06-14T17:54:15+5:30
मृगाच्या पहील्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक घरांचे कौल,पञे यांचेही नुकसान झाले आसून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे .
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणगाव मध्ये मृगाच्या पहील्याच पावसात घराची पडझट व घरात पाणी घुसल्याने खत भिंजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .
गेल्या दोन तीन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामूळे ठाणगावमधील शेतकरी समाधानी झाला असून गावातील पांडुरंग मुरलीधर काकड यांच्या घरात वाळाचे पाणी घुसल्याने घरातील धान्याची नासाडी झाली आहे.तर किसन सखाराम काकड यांच्या घरातही पाणी घुसल्याने घरातील खत पाण्याखाली गेल्याने तीस ते चाळीस खत गोणी पाण्याखाली गेल्याने काकड यांचे खुप नुकसान झाले आहे. मृगाच्या पहील्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक घरांचे कौल,पञे यांचेही नुकसान झाले आसून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे .