मांजरगाव-म्हाळसाकोरे ते हिवरगाव रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 08:41 PM2019-11-06T20:41:20+5:302019-11-06T20:42:06+5:30
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील मांजरगाव म्हाळसाकोरे हिवरगाव पर्यंतच्या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून दयनीय अवस्था आहे.
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील मांजरगाव म्हाळसाकोरे हिवरगाव पर्यंतच्या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून दयनीय अवस्था आहे.
अवकाळी पावसामुळे ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावरून सिन्नर येथे दैनंदिन व्यवहार, बाजारहाट, महाविद्यालयीन शिक्षण, दवाखाने व मुसळगाव माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुचाकीने कामावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते.
सिन्नर लासलगाव आगाराची बस सेवा ही याच रस्त्यावरून चालू आहे. या रस्त्यातील मोठ-मोठ्या खड्यांमुळे वाहनधारकांना खड्डे टाळण्यासाठी एक प्रकारची कसरत करावी लागते. तर अनेक वाहनधारकांना मणक्यांचे आजार बळावले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण व रुंंदीकरण करण्याची मागणी मांजरगाव, म्हाळसाकोर,े हिवरगाव, खामगाव, तारुखेडले, तामसवाडी, करंजी येथील नागरिकांनी केली आहे.