राष्ट्रीय महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:14 PM2018-10-10T18:14:17+5:302018-10-10T18:14:34+5:30
जूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ
नाशिक : विल्होळी-वाडीव-हे महामार्गावर टोलनाक्याअंतर्गत असलेल्या दोन स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असून, सदर स्वच्छतागृहांची जबाबदारी असलेल्या प्रगती कन्स्ट्रक्शन कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
राजूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ कनेक्शन नाही, विद्युत तारा मोकळ्या पडलेल्या आहेत. स्वच्छतागृहांची वाईट अवस्था असल्याने त्याचा वापर करायला कोणी धजावत नाही. रायगडनगर येथील स्वच्छतागृह सहा महिन्यांपासून कुलूपबंद आहे. सदर स्वच्छतागृहाची शौचालय टाकी नाशिक महानगरपालिकेची मुकणे येथून येणारी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनचे काम करणा-यांनी फोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शौचालय कुलूपबंद आहे. तेथे असलेला सुरक्षारक्षक पगार न मिळाल्याने काम सोडून गेला. स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती शेतक-यांनी बोलून दाखविली, सदर स्वच्छतागृहे टोलनाक्याच्या अंतर्गत असून महामार्गावरून येणा-या, जाणा-या वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी ते उभारण्यात आले आहेत; परंतु टोल वसूल करणारी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी महामार्गावर प्रवासी व वाहनचालकांना प्रसंगी उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे.